Share

“मनसैनिकांची धरपकड कशासाठी?”; राज ठाकरेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आवाजांचा त्रास होत असेल तर मंदिरावरचे सुद्धा भोंगे उतरवा. महाराष्ट्रात दंगे नकोत पण भोंगे उतरायलाच हवे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, ९२ टक्के ठिकाणी अजान झाली नाही म्हणून खुश होण्याच कारण नाही. मुस्लिमांनी धार्मिक वळण दिल तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच मनसैनिकांची धरपकड कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले, भोंग्यांचे आवाज बंद झाले पाहिजेत नाहीतर आंदोलन सुरूच राहणार. कायद्याचा प्रश्न पोलिसांनी बघून घ्यावा. प्रार्थनेला बंदी नाही, भोंगे बंद करा. फक्त लोकांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आहे. हनुमान चालीसा पठनवरून मुंबई पोलीस मनसैनिकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर बोलताना मनसैनिकांची धरपकड कशासाठी? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

औरंगाबाद सभेत राज ठाकरे मनसैनिकांना काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!