पुणे : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत.
प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बॉलिवूड आणि हॉलिवूड असा वाद रंगला आहे. यात अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने बॉलिवूडकरांवर टीकास्त्र डागत त्यांना मुर्ख म्हटलं आहे.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे.
आपल्या देशातील बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या कायद्यांच्या संदर्भात आणि यामुळे सुरु झालेल्या वादाबाबत उघडपणे भूमिका घेतली आहे. अजय देवगण,स्वरा भास्कर,कंगना रानौत,सुनील शेट्टी,दिलजित दोसांज,तापसी पन्नू या कलाकारांनी या कायद्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. मात्र मराठी सेलिब्रेटी याबाबत फारशी काही भूमिका घेताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
मराठी चित्रपट श्रुष्टीत अनेक कलाकार हे शेतकऱ्यांची मुलं आहेत असे असूनही देशात सध्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चर्चेत असताना गप्प का आहेत हे न उलघडणारे कोडे आहे. कुणाला ट्रोल होऊ याची भीती,कुणाला वाद निर्माण झाला तर काम मिळणार नाही याची भीती वाटतेय तर कुणाला कोर्ट कचेरीची भीती वाटत आहे.जे कलाकार कलेच्या क्षेत्रात नायक म्हणून मिरवतात अश्या कलाकारांनी जो मुद्दा बुद्धीला पटतो त्याबाबत भूमिका घेतली नाही तर खलनायक आपला डाव साधणार हे त्रिवार सत्य आहे.
आंदोलनाला समर्थन करणे ,विरोध करणे किंवा तटस्थ राहणे हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र जेव्हा सेलिब्रेटी एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी आवाज उठवतात त्यावेळी त्या प्रश्नांचे गांभीर्य सत्ताधारी मंडळींच्या लवकर लक्षात येते हा इतिहास आहे. कलाकारांनी एखादी भूमिका घेतल्यावर सरकारला देखील काही भूमिका घेणे अपरिहार्य बनते हे वारंवार निदर्शनास आले आहे.मात्र मराठी कलाकार सामाजिक समस्यांवर किंवा वादग्रस्त,अन्यायकारक मुद्यांपासून सहसा दूर राहण्याचा प्रयत्न करतात असेच दिसून आले आहे.
गप्प राहून जे सुरु आहे त्याला या कलाकारांची मूकसंमती आहे का? असा सवाल उपस्थित व्हावा अशी सध्या स्थिती आहे. सोशल मिडीयावर असंख्य चाहते असणारे कलाकार जेव्हा एखादी भूमिका समाजहिताची घेतात त्यावेळी त्या मुद्याची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यांच्या भूमिकेला जनसामान्यांच्या पाठींबा मिळायला सुरुवात होते.मात्र बोटांवर मोजण्या एवढे कलाकार सोडले तर बहुसंख्य मराठी कलाकार बोटचेपी भूमिका घेताना पाहायला मिळतात.आगामी काळात तरी ज्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत आहे असे कलाकार भूमिका घेतील हीच अपेक्षा.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

