Share

मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर अभिषेक बच्चन का भडकला ; जाणून घ्या कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि पती अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांची  लेक आराध्या बच्चन (Aradhya Bachchan) ही १० वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सप्रमाणे आराध्या नेहमीच चर्चेत असते. कधीकधी आराध्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. दरम्यान नुकतंच आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर अभिषेक भडकला असून चांगलेच सुनावले आहे.

अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ चा (movie ‘Bob Biswas’) ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेकच्या भूमिकेचे सर्वचजण कौतुक करताना दिसत आहेत. तसेच अभिषेक प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र एका मुलाखतीत त्याला आराध्याला ट्रोल करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिषेक म्हणाला, “मी हे कोणत्याही प्रकारे स्विकारु शकत नाही. ही एक अशी गोष्ट आहे जे मी अजिबात सहन करु शकत नाही. मी एक सेलिब्रेटी असलो तरी माझी मुलगी या सर्व गोष्टींच्या बाहेर आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही माझ्यासमोर येऊन बोला.”

https://www.instagram.com/p/CWXvKVcvSrr/?utm_source=ig_web_copy_link

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन आता दहा वर्षांची झाली असून यंदा तिच्या वाढदिवसानिमित्ताने खास मालदिवची ट्रीप प्लॅन केली होती. “माझी परी आराध्या १० वर्षांची झाली. आराध्या तू माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस. तू माझे जीवन आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते,” अशी कॅप्शन देत ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले होते. यावेळी आराध्याने छान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती सुंदर बाहुलीप्रमाणे दिसत होती.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!