मुंबई: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला अहमदनगर प्रशासन परवानगी देत नसल्याचे थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाहीये. आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाहीये. कृपया असे कृत्य करू नये. अन्यथा संघर्ष अटळ आहे.”, असे ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाहीये. आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाहीये. कृपया असे कृत्य करू नये. अन्यथा संघर्ष अटळ आहे. pic.twitter.com/7okIu99CUs
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) May 26, 2022
गोपीचंद पडळकर यांनी पत्रात नेमके काय म्हटले?
हिंदू संस्कृतीच्या जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी चौंडी येथे दिमाखात साजरी केली जाते. चौंडी येथील जयंतीचा कार्यक्रम सर्वपक्षीय सर्व जातीधर्माच्या लोकांचा असतो. लाखो लोक येथे आपल्या मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात.
ह्या वर्षीदेखील ३१ मे रोजी जनसमुदाय येणार असून त्या जनसमुदायास मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती. असे पत्र गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर प्रशासनाला पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?; दिपाली सय्यद यांचा सवाल
- महाराजांचा सन्मान कसा करायचा आम्हाला शिकवू नका – चंद्रकांत पाटील
- ‘कपड्याची बॅग भरायला घ्या…’, ED च्या कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा व्हिडीओ!
- मराठवाडा भागातील विलासराव देशमुख हे एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते- छगन भुजबळ
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विद्या चव्हाण यांनी दिले जेवणाचे आमंत्रण; म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

