🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी करण्यास सुरू केले आहे. सोबतच त्यांच्या मुंबईस्थित वांद्रेभागातील घरातही कारवाई सुरु आहे. एकूण सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने ही कारवाई सुरू केले आहे. कारवाई केल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आलाय. परब यांचे अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी दंड थोपटले आहेत. यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब हे आमचे सहकारी आहेत. पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने कारवाया सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर अनेक गुन्हे आहेत, परंतु त्याल्या कोणी हात लावत नाही. आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या आणि बदलाच्या भावनेने किती कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पाडणार, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या पंचावन्न वर्षात कधी मिळालं नव्हतं, असे संजय राऊत म्हणाले.
हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्यामुळे विरोधकांना अशाप्रकारे नामोहरण करावं, असं कुणाला वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास सरकारचा मनोबल अजिबात खचणार नाही. अशा प्रत्येक कारवायांमुळे आमचे मनोबल वाढत जाईल. आमच्याकडे सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांविरोधात असंख्य पुरावे आहेत. जितू नवलानीला कोणी पळवलं याचे उत्तर सुद्धा सबळ पुरावे असणाऱ्यांनी द्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.
अनिल परब यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली या तांत्रिक बाबींविषयी माझ्याकडे माहिती नाही. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. हे फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे. शिवसेनेला त्रास द्यायचं, शिवसेनेला बदनाम करायचं. सरकारला कोंडीत आणण्यासाठी या संपूर्णपणे कारवाया सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या कारवाया केल्या जात आहेत. परंतु आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही. मी सातत्याने घोटाळ्याचे पेपर दिल्लीला देत आहे, परंतु त्यावर साधं उत्तर येत नाही. विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो. टॉयलेट घोटाळा अजून मोठ प्रकरण आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला म्हणून मी त्या मागे घेणार नाही. मी इतर काही प्रकरण पाठवले आहेत. परंतु ती फाइल उघडून पाहण्याची तसदी देखील कोणी घेत नाही. परंतु आम्ही देखील पाहून घेऊ, असे संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
