Share

“चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची”, ‘त्या’ वक्तव्यावरून सचिन सावंत यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा.”, असा खोचक सल्ला दिला आहे. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. आता यावरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

“चंद्रकांत पाटील यांची भाषा मनुवादी संघाच्या शिकवणीची आहे. स्त्री जीवन ‘चूल आणि मूल’ इतपतच. ‘१० मूले, ४ मुले काढा’उगीच म्हणत नाहीत. तसेच स्त्री संपर्क विषसमान! म्हणूनच संघ कार्यकारिणीत स्त्रीया नाहीत. ‘मसणात जा’ म्हणणे केतकी चितळेच्या धर्तीवर आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.”, अशी टीका सचिन सावंत यांनी ट्वीट करत केली आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!