उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा आणि देवधानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत ठेकेदारामार्फत पोषक आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र, तांदळाच्या ५० किलोच्या गोण्यामध्ये ३५ किलोच तांदुळ आणि ४५ किलो मसूर दाळ आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या या आहाराच्या आडून नेमके कोणाचे ‘पोषण’ होत आहे, असा सवाल पालकांनी विचारला आहे.
शालेय पोषण आहार योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागात तांदूळ व अन्य धान्यांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. दि.२६ रोजी गोविंदपूर केंद्रातील शाळांना एका वाहनाच्या मार्फत पोषण आहार पुरवठा करण्यात आला. भाटशिरपुरा येथे शाळेची ११५० किलो तांदळाची मागणी आहे.
त्यानुसार आलेल्या धान्याच्या प्रत्येक गोणीचे वजन करून घेत असताना तांदळाच्या अर्ध्या गोण्यात ५० किलोऐवजी कमी तांदुळ भरला. एकूण मागणीच्या तुलनेत ही तफावत १२० किलोची होती. तसेच मसुर दाळीच्या गोणीत ५० ऐवजी ४५ किलोच दाळ निघाली. यावेळी भाटशिरपुरा येथील मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी कंत्राटदाराकडून फरकाचे धान्य वसूल केल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
