Share

खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद मनपा, स्मार्ट सिटी आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन मोहिमेत शनिवारी (दि.२७) नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मात्र नवीन स्मार्ट सीईओ बाबासाहेब मनोहरे उपस्थित राहू शकले नाहीत. आयुक्त पांडेय यांनी मात्र आपण सुरु केलेल्या मोहिमेस हजेरी लावत उपस्थितांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

गेल्या अनेक वर्षात प्रदूषणामुळे नदीचे रुपांतर नाल्यात झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका, व्हेरॉक, भारतीय औद्योगिक महासंघ आणि इको सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षात खाम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. हे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्याला चालना देण्यासाठी मनपा आयुक्तांनी लोकसहभागातून काम व्हावे यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले होते.

त्याला काही प्रमाणात नागरिकांनी देखील प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (दि.२७ ) त्याचाच एक भाग म्हणून सलग चौथ्या शनिवारी लोकसहभाग मोहीम हाती घेण्यात आली. स्मार्ट सिटीच्या सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्विकारला आहे. मात्र तब्येतीच्या कारणास्तव आजच्या या मोहिमेत ते सहभागी होऊ शकलेले नाही. मात्र मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि याआधीचे स्मार्ट सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांची आजही उपस्थिती होती. लोखंडीपूलाजवळ साफसफाई करुन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!