Share

जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून शुक्रवारी उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे १७१ नवे बाधित रुग्ण आढळून आले, यातील १०२ रुग्ण हे एकट्या जालना शहरातील आहे. यामुळे आता जालनेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जालन्यातील एकून कोरोनाबाधितांचा आकडाही १५ हजार १४९ वर जाऊन पोहोचला आहे, तर या ३९० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान १३ हजार ९३१ रुग्णांना आतापर्यंत यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आहे आहे. जिल्ह्यात सध्या ८२८ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

जालना जिल्ह्या दुसऱ्यांदा कोरोनानाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. एकट्या जालन्यात शुक्रवारी १०२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जालना शहरात आता नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात देखील तालुका आणि गावानिहाय कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यात पथकांची स्थापना करून मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!