🕒 1 min read
औरंगाबाद : १ मे ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ ला औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु असताना पाहायला मिळत आहे. ही सभा रेकॉर्डब्रेक सभा होईल असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही म्हटलं आहे.
मनसेचे हिंदुत्व बोगस आहे असे काल मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेला कुणाचं हिंदुत्व बोगस आणि खरं आहे हे माहीत असून हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक कसे वागतायत हे महाराष्ट्राला माहीत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आपण कुठे होतो याच आत्मपरीक्षण करावं”. तसेच औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार असून प्रत्येकाला अधिकार आहे असं सांगत यावर त्यांनी बोलण्याच टाळलं.
चुकीची भाषा महाराष्ट्रात चालू देणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षातील नेते चुकीचं बोलतायत ते आधी त्यांनी बघावं, नंतर आम्हाला उपदेश करावे असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
