नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ध्वज फडकावला आणि देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह आयोजित केला आहे. त्यामुळे मोजक्या उपस्थितांसह हा कार्यक्रम सुरू आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. लोकांचा संघर्ष आणि त्याग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ ऑगस्ट हा आता फाळणी भयस्मृती दिवस म्हणून पाळला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल. ज्यांनी अत्याचार सहन केले, सन्मानासोबत अंत्यसंस्कारही मिळाले नाही ते आपल्या आठवणीत जिवंत राहणं गरजेचं आहे.’
हम आजादी का जश्न मनाते हैं, लेकिन बंटवारे का दर्द आज भी हिंदुस्तान के सीने को छलनी करता है।
यह पिछली शताब्दी की सबसे बड़ी त्रासदी में से एक है।
कल ही देश ने भावुक निर्णय लिया है।
अब से 14 अगस्त को विभाजन विभीषिका स्मृति दिवस के रूप में याद किया जाएगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2021
ब्रिटिशांनी १९४७ साली भारताची फाळणी केल्यानंतर पाकिस्तानची मुस्लीम देश म्हणून निर्मिती करण्यात आली. लाखो लोक विस्थापित झाले आणि धार्मिक हिंसाचारात लाखो लोकांनी जीव गमावला. भारत आपला पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिन रविवारी साजरा करत आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्टला असतो. मोदी यांच्या घोषणेनंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्रालयाने १४ ऑगस्ट हा ‘फाळणी भयस्मृती दिवस’ म्हणून अधिसूचित केला.
कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय
कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय झाल्याचे ते म्हणाले. ‘जर भारताकडे आपली लस नसती तर काय झालं असतं. पोलिओची लस मिळवण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागली होती. संपूर्ण जगभरात इतकं मोठं संकट असताना आपल्याला लस कशी मिळाली असती. पण आज सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे. ५४ कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. ‘कोरोना संकटात भारताने ज्याप्रमाणे मोफत धान्य दिलं हा जगासाठी चर्चेचा विषय आहे. कोरोनाच्या महामारीत वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस विकसित करणारे शास्त्रज्ञ आणि देशातील जनतेने संकटाचा सामना केला असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
- ‘अमृत महोत्सवाचे वर्ष नवी ऊर्जा, नवीन चेतना घेऊन येईल’, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
- ‘संजय राठोड प्रकरणात खर-खोटे समजण्यासाठी व्हाइट पेपर काढा’ ; मुनगंटीवारांची मागणी
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

