नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहे.भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली. तसंच महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्यासह अनेकांचा उल्लेख केला.
Delhi: Prime Minister Narendra Modi begins his address on #IndependenceDay2021, from the ramparts of the Red Fort. pic.twitter.com/B2rVf4G2FY
— ANI (@ANI) August 15, 2021
या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा होत आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सकाळी ७.१८ मिनिटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचले. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते.
Delhi | Defence Minister Rajnath Singh, MoS Defence Ajay Bhatt and Defence Secretary Dr Ajay Kumar receive Prime Minister Narendra Modi at Red Fort pic.twitter.com/QvqinS7kmf
— ANI (@ANI) August 15, 2021
त्यानंतर पंतप्रधानांना लष्कराच्या तीनही दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दरम्यान, दिल्ली पोलिसांची एक तुकडीही या कार्यक्रमात उपस्थित राहिली. या मानवंदनेनंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचले आणि तिरंगा फडकावला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी लष्कराकडून २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर लष्कराच्या वेगवेगळ्या तुकड्या आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतीय वायुदलाच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.
Prime Minister Narendra Modi hoists the National Flag from the ramparts of Red Fort to celebrate the 75th Independence Day pic.twitter.com/0c3tZ6HQ3X
— ANI (@ANI) August 15, 2021
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम’ हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड प्रकरणात खर-खोटे समजण्यासाठी व्हाइट पेपर काढा’ ; मुनगंटीवारांची मागणी
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

