Share

कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहे. मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली. तसंच महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्यासह अनेकांचा उल्लेख केला.

कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय झाल्याचे ते म्हणाले. ‘जर भारताकडे आपली लस नसती तर काय झालं असतं. पोलिओची लस मिळवण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागली होती. संपूर्ण जगभरात इतकं मोठं संकट असताना आपल्याला लस कशी मिळाली असती. पण आज सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे. ५४ कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

‘कोरोना संकटात भारताने ज्याप्रमाणे मोफत धान्य दिलं हा जगासाठी चर्चेचा विषय आहे. कaरोनाच्या महामारीत वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस विकसित करणारे शास्त्रज्ञ आणि देशातील जनतेने संकटाचा सामना केला असे ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा होत आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सकाळी 7.18 मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचले. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!