पुणे : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आज पुण्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समीर वनखेडेंवर टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी आज मुंबई ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं आहे.
ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, असा टोला छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मुस्लीम आहे, असं सिद्ध झालंय, असंही छगन भुजबळ नाही.
आर्यन खान प्रकरण, समीर वानखेडे, के. पी. गोसावी प्रकरणी नवाब मलिक मांडत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे, पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नसल्याचं वारंवार बोलत आहेत. त्यावरुनही भुजबळांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आर्यन खानचा जामीन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचा एकमेकांना काही संबध नाही.शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देतच आहे’, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी भाजपला दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीवर भरोसा नाही, आम्ही त्यांच्या सलगीला भूलणार नाही’
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला
- शरद पवारांवर टीका करणाऱ्या तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल; राष्ट्रवादीची अटकेची मागणी
- ‘क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, पण..’, राऊतांनी स्पष्ट केली भूमिका
- ‘खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
