Share

‘खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली असल्याचा आरोप करत मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर मी राजीनामा देईल आणि राजकारणातून संन्यास घेईल असे म्हटले आहे. यावरूनच आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सवाल केला आहे.

अभ्यास करणे हे आमचे काम नाही,आम्ही फक्त मार्कस देतो,असे मुख्यमंत्री स्वत:च कबूल करतअसताना नवाब मलिक मात्र जन्म-विवाह दाखल्याच्या अभ्यासासाठी मंत्रीपदपणाला लावतात. अभ्यास करायचा नाही हे मुख्यमंत्री सांगत असतानाही खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्यावरून केंद्रावर ताशेरे ओढले आहेत. मात्र यावेळी त्यांनी अभ्यास करणे आमचे काम नाही, तसे असते तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचे काम आमच्याकडे आले आहे, असे मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना उद्देशून म्हटले आहे. यावरूनच केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!