🕒 1 min read
मुंबई : क्रुझ पार्टीवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अट केली होती. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यावरुन राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष महेश हांडे यांनी तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांनी भोसले यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है, असं म्हणत तुषार भोसले यांनी टीका केली होती. या टीकेवरुन राष्ट्रवादीने कारवाईची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, पण..’, राऊतांनी स्पष्ट केली भूमिका
- ‘खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
