Share

‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीवर भरोसा नाही, आम्ही त्यांच्या सलगीला भूलणार नाही’

Published On: 

सोलापूर : काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील माध्यामाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आधी म्हणाले वाझे भाजपचे पोपट आहेत. नंतर हायकोर्टपण म्हणतील. कारण हायकोर्टाने जामीन दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेली घटना सरकारला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करत राहावेत’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आज पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायेच खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा मी आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणे साहजिकच आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ही प्रतिक्रिया त्यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!