🕒 1 min read
नागपूर : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना जोरदार रंगला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यावरुनही भाजपने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर टीका केल आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मलिकांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर टीका करणाऱ्या तुषार भोसलेंवर गुन्हा दाखल; राष्ट्रवादीची अटकेची मागणी
- ‘क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, पण..’, राऊतांनी स्पष्ट केली भूमिका
- ‘खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
