Share

‘क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, पण..’, राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सातत्याने सुरू आहेत. शिवाय मलिक हे समीर यांच्या पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावरही निशाणा साधत आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे.

या सर्व घडामोडीनंतर क्रांती रेडकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का? असा सवाल क्रांती यांनी विचारला आहे.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. साहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहेत. सगळं व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही राऊत यांनी दिली.

तसेच ‘एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकर यांचा काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. क्रांती रेडकर यांच्यावर मला वाटत नाही कोणी व्यक्तीगत टीका केलीये, मी तरी पाहिलं नाही. नक्कीच आता महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ज्या प्रकारे दिल्लीतून आक्रमण सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा प्रयत्न होतोय, खोटे गुन्हे दाखल केले जातात, देगलूरमध्ये देखील धाडी पडल्यात अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत. प्रश्न सत्य-असत्य लढायईचा आहे’ असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!