मुंबई: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी आता शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. दिल्लीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचारावर प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.
संजय राउत यांनी त्यानंतर पुन्हा ट्वीट करत नेहमीच घटनांना कोणाला ना कोणाला जबाबदार धरणाऱ्या सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी, ‘दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी. ममता बॅनर्जी. ऊध्दव ठाकरे.शरद पवार की ज्यो बाईडनचा? इस बात पर त्यागपत्र…राजीनामा तो बनता है साहेब..’ असे ट्वीट करून राउत यांनी असा खोचक सवाल करत सरकारला आव्हान दिले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले. ‘बाबरी मशीद पडली तेव्हाही गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं आणि आज शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. आजचा दिवस हा आणीबाणी सारखाच आहे.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी शहा यांचा राजीनामा मागितला नसल्याची सारवासारवही त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्य
- आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
- ‘आझाद मैदान ते दिल्ली ज्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली त्यांच्या मुसक्या आवळाव्यात’
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणे कंगनाला पडले महागात !
- पंजाबी अभिनेता दीप सिद्धूवर आंदोलन चिघळवल्याचा आरोप…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

