Share

‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार याच मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन जालन्यात, महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चादरम्यान त्यांनी गायकवाड आयोगाचा मागासवर्गाचा अहवाल विश्वासार्ह नाही, असे वक्तव्य केले होते.

वडेट्टीवार यांच्या याच विधानामुळे मराठा समाजात त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे. या घोषणेची अधिकृत माहिती सचिन तोडकर यांनी दिली दिली. तसेच, समस्त मराठा समाजाने वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आता या मुद्द्यावरून मराठा नेते व ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास पुरस्कार देणाऱ्या प्रवृत्तीचा ओबीसी व्ही जे एन टी जनमोर्चाचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी निषेध केला आहे. मंत्रिमंडळात आणि शासकीय स्तरावर ५२ टक्के ओबीसी समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कोणी करू नये,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

यासोबतच, ‘ओबीसी आंदोलनांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे, प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती सामील होत आहेत. हेच कुठंतरी काही संघटनांना पाहवत नाही,’ अशी टीका हाके यांनी केली आहे. ‘महाराष्ट्रातील ओबीसी बांधव ठामपणे विजय वडेट्टीवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.’ असं प्रत्युत्तर देखील लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!