नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी टॅक्टर मोर्चा काढून निषेध केला. मात्र, यावेळी आंदोलक आक्रमक झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. याला जबाबदार कोण आहे? दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा का नाही काढला?
आंदोलनातील हिंसाचार म्हणजे सरकारचं अपयश अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत असतानाच हरियाणातील शेतकरी नेते गुरणाम सिंह यांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आंदोलनामध्ये हिंसाचार घडल्याचा आरोप केला आहे. दीप सिद्धू हा एक पंजाबी अभिनेता असून त्याने रमता जोगी या सिनेमातून पदार्पण केले असून ‘जोरा दास नुंबरिया’ सिनेमांमध्ये गॅंगस्टर ची भूमिका निभावली आहे.
२०१९ मध्ये जेव्हा अभिनेते सनी देओल हे लोकसभा निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांच्या प्रचार मोहिमांमध्ये दीप सिद्धूचा देखील समावेश होता. मात्र दीप सिद्धूवर आंदोलनाची घडल्याचा आरोप झाल्यानंतर खासदार सनी देओल यांनी ट्विट करत, ‘लाल किल्ल्यावर जे झालं त्याने मी दुःखी आहे. मात्र दीप सिद्धू याच्याशी माझा किंवा माझ्या परिवाराचा कोणताही संबंध नाही.’
आज लाल क़िले पर जो हुआ उसे देख कर मन बहुत दुखी हुआ है, मैं पहले भी, 6 December को ,Twitter के माध्यम से यह साफ कर चुका हूँ कि मेरा या मेरे परिवार का दीप सिद्धू के साथ कोई संबंध नही है।
जय हिन्द— Sunny Deol (@iamsunnydeol) January 26, 2021
आंदोलनादरम्यान दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर निशाण साहिब चा झेंडा लावला तर त्याने यावेळी तिरंगा हटवून हा झेंडा लावण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकरी नेते गुरनाम सिंह आणि योगेंद्र यादव यांनी केला आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना दीप सिद्धूने सांगितले की, ‘आम्ही लोकशाही मार्गाने आमचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवला मात्र आम्ही यावेळी तिरंग्याला हटवले नाही.’
महत्वाच्या बातम्य
- आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
- ‘आझाद मैदान ते दिल्ली ज्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली त्यांच्या मुसक्या आवळाव्यात’
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- दिल्ली धुमसतीये : १८ पोलीस जखमी तर एकाची प्रकृती गंभीर
- दिल्लीतील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले महत्वाचे पाऊल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

