Share

आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं

Published On: 

नागपूर : काल महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले होते. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. वीजबिल, विदर्भाला दिली जाणारी वागणूक, भंडारा दुर्घटना, यासह राज्यातील इतर प्रश्नांवरून फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं.

महाविकास आघाडी विदर्भासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. ‘विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी करायची होती म्हणून मुख्यमंत्री पहिल्यांदा विदर्भात आले. या सरकारने विदर्भातील प्रकल्प बंद केले. विदर्भाला पैसे मिळायचे ते वैधानिक महामंडळही बंद केलं,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच सुनावलं आहे. ‘आमच्या धमण्यांमध्ये विदर्भाचं रक्त आहे. आम्हाला कोणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. विदर्भाशी आमचं रक्ताचं नातं आहे. सगळ्यांचंच नातं घेऊन मी पुढे जात आहे.’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!