नवी दिल्ली : ट्वीटर वरून नेहमीच प्रत्येक वादात उडी घेणारी अभिनेत्री कंगना रणौतने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या घटनेवर भाष्य करताना बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका, असं तिने म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केला होता. कंगना रणौतने या पूर्वी देखील या आंदोलनाबाबत अनेक वादग्रस्त विधानं केलेले होते. आज सकाळपासूनच दिल्लीमधील शेतकरी आंदोलन चिघळल्यामुळे तिने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर घणाघात केलेला आहे.
यावेळी मात्र कंगनाला शेतकरी चांगलेच महागात पडले आहे. कंगनाने सांगितले कि, शेतकरी आंदोलनाचा विरोध केल्याने तिच्या सोबत कॉन्ट्रेक्ट केलेल्या ६ ब्रैंड्सने कॉन्ट्रेक्ट मागे घेतले आहे. यामध्ये काही सोबत ती काम करत होती तर काही सोबत ती आगामी काळात कामा सुरु करणार होती. कारण नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी कंगना ही आपल्या ब्रैंड्स च्या प्रतिमेला मारक ठरू शकते हे या मागील कारण आहे. तर कंगनाने यावर बोलताना सांगितले कि शेतकरी आंदोलनात बोलले म्हणन मला या ब्रैंड्सने एम्बेसडर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sick and tired of riots and blood bath almost every month , Delhi, Bangalore and now again Delhi #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ #RedFort pic.twitter.com/pWhXtOrqkx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
“आज प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला आणि तिथं खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आजचा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशासाठी आनंदाचा ठरला असता. मात्र, लाल किल्ल्यावरुन जे फोटो आले आहेत ते मन हेलावून टाकणारे आहेत. स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल तर आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही. आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही.” अस वक्तव्य तिने आपल्या व्हिडीओ मध्ये केलेले आहे.
यापुढे जाऊन “जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,” अशा शब्दांत कंगनानं आजच्या घटनेवर भाष्य केलं.
महत्वाच्या बातम्य
- आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
- ‘आझाद मैदान ते दिल्ली ज्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली त्यांच्या मुसक्या आवळाव्यात’
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- दिल्ली धुमसतीये : १८ पोलीस जखमी तर एकाची प्रकृती गंभीर
- पंजाबी अभिनेता दीप सिद्धूवर आंदोलन चिघळवल्याचा आरोप…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

