Share

‘आझाद मैदान ते दिल्ली ज्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली त्यांच्या मुसक्या आवळाव्यात’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रकार घडला आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले होते. परवानगी दिलेला मार्ग सोडून इतर भागात घुसण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलकांनी केल्यामुळे पोलीस व आंदोलक यांच्यात मश्चक्री पाहायला मिळाली. आंदोलकांनी पोलिसांवर हल्लाबोल करून ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र, आक्रमक शेतकऱ्यांपुढे हे प्रयत्न कमी पडले.

या घटनेमुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागलं असून अनेक पोलिसांसह शेतकरी देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या घटनेचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे.

आता विरोधकांची या आरोपानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यातील नेत्यांसह इतर नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘आझाद मैदान ते दिल्ली ज्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला चिथावणी दिली त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तुरुंगात डाम्बावे अशी मागणी मी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करतो आहे.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांकडे असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!