Share

‘सूर नवा ध्यास नवा’ चौथ्या पर्वाची कोण ठरणार विजेती ?

Published On: 

मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाची भुरळ प्रेक्षकांवर टाकली आहे.रविवारी या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा रंगणार आहे. दमदार गाणे गणारे सगळेच स्पर्धक असल्यामुळे आता अंतिम सामना कोण जिंकणार हा पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. हि स्पर्धा  आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या सुरेल मैफिलीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी १३ जूनला संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ चं हे चौथे पर्व. हे पर्व फक्त गायिकांचे होते. या कार्यक्रमातील १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचे स्थान मिळवले. अहमदनगरची सन्मिता धापटे- शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत स्थान मिळवलं.

या १६ पैकी सहा गायिकांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून आपली विशेष छाप सोडत महाअंतिम फेरी गाठली. आता अल्पावधीत महाराष्ट्राच्या लाडक्या ठरलेल्या या सहा गायिका सज्ज झाल्या आहेत, महाअंतिम सोहळ्यासाठी. ही चुरस खूप उत्कंठा वाढवणारी असणार आहे.

या महाअंतिम सोहळ्यात ‘सूर नवा ध्यास नवा’ चे लोकप्रिय कॅप्टन्स रॅाकस्टार संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय संगीतकार महेश काळे यांचीही कला यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  तसेच या पर्वाचा संगीत समुपदेशक, गायक, संगीतकार अजित परब, तरूणांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर यांचे भन्नाट परफॅार्मन्स या सोहळ्यात सादर करणार आहेत. यामुळे आता काही वेळातच महाराष्ट्राची महागायिका कोण ठरणार हे पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!