प्रतापगड : जगभरात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार केला आहे. भारत देशही कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनामुळे उत्तर प्रदेशमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये चक्क कोरोना देवीचे मंदिर बांधण्यात आलं. या मंदिराला कोरोना देवी मंदिर असं नावही देण्यात आलं. या मंदिरात एका मूर्तीची स्थापना केली असून लोकांनी पूजा करण्यासही सुरुवात केली. या मूर्तीला मास्कही लावण्यात आला होता. इतंकच काय तर जेथे मंदिर बांधण्यात आलं आहे. तिथे दान म्हणून काय टाकावं आणि काय टाकू नये. हे देखील लिहण्यात आलं आहे. या मंदिरात एक पुजारीही नियुक्त करण्यात आला आहे.
परंतु आता येथील जिल्हा प्रशासनाने प्रतापगढ जिल्ह्याच्या संगीपूर ठाण्याच्या क्षेत्रातील जूही शुकुलापूर या गावातले कोरोना मातेचे मंदिर तोडले आहे. तसेच या मंदिराच्या निर्मितीबाबत चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. प्रयागराज रेंजचे पोलीस महानिरीक्षक के. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अंधश्रद्ध हालचालींपासून गावाला वाचवण्यासाठी पोलिसांनी हे मंदिर हटवले आहे. त्यांनी म्हटले आहे की पोलीस या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धांमध्ये अडकू नये. असे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान, हे कोरोना देवीचे मंदिर गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा करून गावकऱ्यांच्या एका समूहाने बांधले होते. गावकऱ्यांनी कोरोनामातेची प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती की कोव्हिड-19ची सावलीही शुकुलापूर आणि आसपासच्या गावांवर पडू नये. त्यांनी या मंदिरात पूजा करताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांवरही प्रकाश पाडला होता. तसेच त्यांनी मूर्तीलाही मास्क घातला होता.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना संकटात ही बँक देणार ग्राहकांना मोफत रेशन
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

