औरंगाबाद : मुख्यमंत्र्याचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष न दिल्यास मराठा समाजातील वंचित नक्षलींच्या कारस्थानाला बळी पडतील असं मेटे म्हणाले. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मेटे म्हणाले, ‘आरक्षणासाठी कायदेशीर तज्ञ समिती नेमणार आहे. या समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढा दिला जाणार आहे. रस्त्यावरही आम्ही लढणार आहे. जर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर येत्या ७ तारखेपासून सुरू होणार अधिवेशन चालू देणार नाही. सत्ताधारी मराठा आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली नाही. केंद्र सरकारने ३ दिवसात फेरविचार याचिका दाखल केली’, असंही मेटे म्हणाले.
आम्ही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर दौरा सुरू केल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत, त्यानंतर संपुर्ण राज्यातील जिल्ह्यात मेळावे घेणार आहोत त्यानंत सर्व जिल्ह्यात आम्ही मोर्चे काढणार आहोत. हे मूक आंदोलन नसेल हे बोलकं आंदोलन असणार आहे, सरकारला धारेवर धरणार आणि न्याय मागणारे आंदोलन असेल असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

