औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंनी १६ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्याआधी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आल्याची टीका विनायक मेटेंनी केली.
‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्यात नागरिकांचे मार्गदर्शन आणि संवाद करणार आहे. जिल्हाभर मेळावे घेतले जाणार आहेत. महसूल कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. पण आमचे आंदोलनं मूक नाही तर बोलके असणार आहेत, असे म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजेंना टोला लगावला आहे.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सरकारला धारेवर धरणार आणि न्याय मागणारे आमचे आंदोलन असेल. मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पाच लोकांची कायदेशीर समिती नेमली जाईल. त्यांचा अहवाल घेऊन त्यानुसार कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत. ५ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
यावेळी मेटे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनाची स्थापन करा, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहावं. अन्यथा नक्षलवाद्यांनी टाकलेल्या डावाला प्रतिसाद मिळणार नाही, असं होणार नाही असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. जे नक्षलवाद्यांना कळलं आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधी कळणार, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
‘औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचा पहिला मेळावा घेणार आहोत. २६ जून रोजी औरंगाबादमध्ये मोठा मेळावा होईल, शाहू महाराजांच्या स्मृती निमित्त हा मेळावा असणार आहे. तसंच २७ जून रोजी मुंबईमध्ये १० हजार मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे’, अशी माहितीही मेटेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

