🕒 1 min read
लक्षद्वीप : लक्षद्वीपमधील चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आयशा सुलताना यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात भाजपच्या स्थानिक १५ नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यात लक्षद्वीप भाजपचे सचिव अब्दुल हमीद मुल्लीपुजा यांचाही समावेश आहे. या सर्व सदस्यांनी लक्षद्वीप भाजपचे अध्यक्ष सी. अब्दुल कादर हाजी यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत.
हाजी यांच्या तक्रारीवरूनच आयशा सुलताना यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. यावर भाजप सोडणारे नेते अब्दुल हामिद यांनी सांगितलं की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही आमचा राजीनामा देत आहोत.
नेमकं प्रकरण काय आहे?
शुक्रवारी लक्षद्वीपची पहिली महिला फिल्ममेकर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलीस स्टेशनमध्ये राजद्रोहाचा गुन्ह्याची नोंद झाली होती. एका टीव्ही शोच्या चर्चेदरम्यान आयशा यांनी लक्षद्पीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यावरून टीका केली होती.
कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरू
राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपच्या १२ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षरीचं एक पत्र अब्दुल खादर हाजी यांनी पाठवण्यात आलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, भाजपला हे माहित आहे की प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय जनविरोधी, लोकशाही विरोधी असून लोक या सगळ्याला त्रासलेत.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
