Share

‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप

Published On: 

नाशिक: राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही. याकरिता संसदेत आवाजही उठवला. पण अद्यापही आकडेवारी समोर न आल्याने ओबीसींचे नुकसान झाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काय म्हणाले ते पाहा..

आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जनगणना आवश्यक
महाराष्ट्रात शरद पवारांनी मंडल आयोगाची अमलबजावणी करून ओबीसींना अधिकार मिळवून दिले. या ओबीसी वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत हा प्रश्न मांडून ओबीसी जनगणना करण्यास पाठपुरवा केला. मात्र अद्याप देखील ती आकडेवारी जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे,

आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत तसेच मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भुजबळांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे. ओबीसी आरक्षणाला तसेच इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सर्व पक्षीयांनी मान्य केली आहे. त्यानुसार सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!