Share

आता विधानसभेचं प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे ? शरद पवार म्हणतात…

Published On: 

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे. यामुळे आता अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाकडे जाणार हे महत्वाचं ठरणार आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे.’ असं म्हणत त्यांनी आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील उत्सुक असल्याचे संकेत देखील दिले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी निश्चित !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेसला सहभागी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. महत्वाच्या खात्याचा सांभाळ व राज्यातील काँग्रेसच्या कार्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा कोणत्या नेत्याकडे जाणार याबाबत उत्सुकता वाढली होती.

पुढील प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेसच्या कमिटीचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, हायकमांड कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आज नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे आता हे नक्की झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!