औरंगाबाद : शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.४) संभाजीनगर मुद्यावरून मनसेने शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना क्रांती चौकात अडवून संभाजीनगर नामविस्ताराचे पत्र त्यांचा अंगावर फेकले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या एक दिवस आधी मनसेने हा राडा घातला आहे. महाराष्ट्र देशाने याविषयी मित्रपक्षाची मते विचारात घेतली.
औरंगाबाद कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी सांगितले, ‘ भारतात लोकशाही असली तरीही हा प्रकार चुकीचाच आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे टार्गेट करणे, रस्त्यावर अडवणूक करणे चुकीचेच आहेत. लोकशाहीत कोणीही कोणाचा शत्रू किवा मित्र नसतो. त्यामुळे खैरे साहेबावर असा हल्ला होणे चुकीचेच आहे. नामांतराचा मुद्दा हे त्यांचे वैयक्तिक भांडण नाहीच मुळी ‘. अशी प्रतिक्रिया कल्याण काळेनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- आपला फोटो लावून खंडणी वसुल करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच : आशिष शेलार
- शरजीलचे वक्तव्य चुकीचे आणि दुर्दैवी – उर्मिला मातोंडकर
- ‘संभाजीनगर’साठी मनसेचा राडा, चंद्रकांत खैरेंच्या अंगावर भिरकावली पत्रके
- नामांतराचा मुद्दा; मुख्यमंत्री ठाकरेंचीही गाडी अडवणार, मनसेचा इशारा
- कॉंग्रेसला सरकार मध्ये शुन्य किंमत आहे, हेच ‘या’ व्हिडिओतून स्पष्ट होतंय – राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
