Share

ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

Published On: 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी टॅक्टर मोर्चा काढून निषेध केला. मात्र, यावेळी आंदोलक आक्रमक झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. पण दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. त्यांनी उग्र आंदोलन केलं. पण दुर्दैवाने यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

दिल्लीतील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रामपूरला रवाना झाल्या आहेत. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहे. नवरीत सिंग यांचा दहाव्याचा आज कार्यक्रम आहे. प्रियंका गांधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅकटर रॅलीनंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर ज्यामध्ये पलटी झाला. नवरीत सिंग यांचा या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. सिंग यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात देखील अपघात आहे. प्रियंका गांधी दिल्लीतून निघाल्या आहे. त्यांच्यासह उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंग देखील आहे. NH-24 मार्गाने त्या उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाणार आहे. त्यांच्यासह गाड्यांचा मोठा ताफा देखील आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!