Share

‘ही तर बाळासाहेबांची इच्छा’, मनसेचे स्पष्टीकरण

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर करणे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच रस्त्यावर उतरलो आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शहराच्या संभाजीनगर नामकरणासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शहरात दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या एक दिवस आधीच मनसेने आक्रमक भूमिका घेत क्रांती चौकात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला.

संभाजीनगर नामकरण व्हावे यासाठी मनसेने यापूर्वीच अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम संपल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसेने घेतली होती. त्याप्रमाणे आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे या आशयाची पत्रकेही खैरे यांच्या अंगावर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी भिरकावली. यावेळी शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.

तसेच बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरत असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. दरम्यान, औरंगाबाद येथील घटनेनंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!