मुंबई:- जावळी-सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेच्या रूपानं तिथं पुन्हा एकदा ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे असा सामना रंगला आहे. शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादाला अधिकच धार चढली आहे.
कुडाळमधील एका मेळाव्यात बोलताना शिवेंद्रराजे यांनी प्रथमच आक्रमक भाषा वापरली. ‘माझी वाट लागली तरी चालेल, पण मला त्रास द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवेन. काट्यानं काटा कसा काढायचा, हे मलाही माहीत आहे. मी कुणालाही घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलो आहे हे विसरू नका, असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं होतं. त्यांचा रोख शशिकांत शिंदे यांच्याकडं होता.
दरम्यान, धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना व समोराच्यांना बरे वाटावे, आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत. यासाठी असे वक्तव्य कधी कधी करावे लागते. पण त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिउत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंनी शशीकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- इंधनाचे दर गगनाला भिडले असताना विरोधक झोपी गेले आहेत का ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

