🕒 1 min read
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि.५) शहरात येत आहेत. जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी मनपा हद्दीतील काही विकासकामांचा आढावा देखील मुख्यमंत्री घेतील. तसेच मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील एखाद्या नव्या उपक्रमाची घोषणा होईल अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.
काही दिवसांपूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. त्यावेळी अनेक विकासकामांचा धडाका सुरु करण्यात आला तो आजपर्यंत कायम आहे. मात्र या सर्व गोष्टींचा फायदा होऊ घातलेल्या मनपा निवडणूकीत शिवसेनेला नक्कीच होणार आणि त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातीने औरंगाबाद शहरात लक्ष घालत आहेत.
या दौऱ्यात मुख्यमंत्री एमआयडीसीने तयार केलेल्या रस्त्यांची पाहणी करतील. सुभेदारी विश्रामगृहाजवळील दीड एकर जागेवर अॅम्पी थीएटरचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे करतील. तेथे पोलीस आणि आर्मीतील बँड पथक आठवड्यातून एकदा परेड घेतील ही परेड सामान्यांसाठी उपलब्ध असेल. तसेच किलेअर्क तटबंदीचे संरक्षण, शासकीय महाविद्यालय प्रवेश सुशोभीकरणासह सुभेदारी विश्रामगृहातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण या कामांचा यात समावेश आहे. दोन कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सेलेब्रेटींचं ‘Tweet Together’; शेतकरी आंदोलनासंबंधित सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट केलं कॉपी
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ‘मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी आज गाझीपूर सीमेवर जाणार’
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
