Share

‘सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली?’, शिवसेनेचा नारायण राणेंवर पलटवार

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. अटक आणि जामीन झाल्यानंतर राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेवर प्रखर टीका करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत असा दावा करून राणे यांनी काही जुन्या प्रकरणाला उजाळा दिला आहे.

यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना राऊत म्हणाले की, ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसाऱख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकलं आणि जाळलं याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असं मला त्यांना विचारायचं आहे. तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूस केली आहे का?’ असे गंभीर आरोप त्यांनी केले.

‘राणेंचे बाकी काय धंदे चालतात हे आम्हाला उकरुन काढायचं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद आणि विधानसभेत नारायण राणे कुंडली केली होती आणि सभागृहात वाचून दाखवली होती त्याचा अभ्यास आता महाराष्ट्र सरकारला करण्यास सांगणार आहे’ असंही त्यांनी सांगितले.

नारायण राणे काय म्हणाले होते?
शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे? आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर एसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर एसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. असा सज्जड दमही राणे यांनी कुणाचेही नाव न घेता दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!