Share

‘जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन’, नारायण राणेंचा विश्वास

Published On: 

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली.

यात्रेदरम्यान शुक्रवारी नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की, मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले.

आंबा-काजू बागायतदारांनी निवेदनं देऊन राणेंना आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका शेतकऱ्यानं आत्महत्येची वेळ येईल असंही म्हटलं. यावर नारायण राणे यांनी तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही. जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

राणे म्हणाले की, कोकणच्या शेतकऱ्यांना माझ्या खात्याचा फायदा होईल असा प्रयत्न करणार आहे. एका महिन्याच्या आत बैठक घेऊन प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. अजून दोन दिवस दौरा आहे, आठवडा फिरून घसा बसला आहे, त्यामुळं आता जास्त बोलत नाही’, असे म्हणत ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!