🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक आज घेण्यात आली. बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेऊ नका. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल असे बैठकीत आपण सांगितल्याचे ते म्हणाले. ‘या संदर्भात पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. काही कायदेशीरबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठका होणार आहे. आम्ही बैठकांना तयार आहोत’, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, के कृष्णमूर्ती आणि खानविलकर जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे, की राजकीय मागासलेपणाबाबतची एम्पिरिकल डेटाची चौकशी करायची आहे. याचा जनगणनेशी कोणताही संबंध नाहीये. तो परिच्छेद मी आजच्या बैठकीत वाचून दाखवला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तिहेरी चाचणी यामध्ये अपेक्षित आहे. त्यापैकीचा पहिला भाग आपण समिती नेमून पुर्ण केला आहे. दुसरा भाग म्हणजे राजकीय मागासलेपणाची चौकशी करण्याचे काम हे कमिशनला करायचे आहे. तिसरी चाचणी ही ५० टक्क्यांची आहे. जोवर कमिशन इन्पेरिकल डेटा तयार करत नाही, तोवर हे आरक्षण परत येणार नाही. हे जजमेंटच्या आधारावर सांगितले.
Interacting with media in Mumbai after all-party meeting on #OBCreservation #OBC #Maharashtra https://t.co/BNMVTIhodb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2021
सर्वोच्च न्यायालयाचे २०१९ सालचे कर्नाटकचे चंद्रचूड साहेबांचे जजमेंट मी वाचून दाखववले आहे. एम्पिरिकल डेटा सर्वेक्षण करून तयार केला, तर त्याच्या सविस्तर चौकशीत जाण्याचा कोर्टाला अधिकार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. २०२१ मध्येही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. आपण मराठा आरक्षणाच्यावेळी पाच समित्यांच्या माध्यमातून एम्पेरिकल डेटा तयार केला. तशाच प्रकारचा डेटा तीन ते चार महिन्यात तयार केला जाऊ शकतो. अशा प्रकारेच ओबीसीचे आरक्षण हे निवडणूकांच्या आधी परत करू शकतो. आपल्या राजकीय मागसलेपणाचा डेटा तयार करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सॅम्पलच्या आधारावर हा डेटा तयार करता येतो, त्यामुळे संपुर्ण जनगणनेची आवश्यकता नाही असेही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राज्यपाल भवन भाजपा कार्यालय झालं आहे’, कॉंग्रेसचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
