Share

‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई : घोषणाबाजी, पोस्टरबाजी, हाणामारी, गुन्हे, आरोप प्रत्यारोप हे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गोष्टी आहेत. अर्थात या चर्चांना कारण आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर शिवसेनेच्या युवासैनिकांनी राडा घातला होता. यातील एक असलेल्या मोहसीन शेख याचे पक्षाकडून कौतूक करण्यात आले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. राणे-सेना आंदोलानावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

यावरून आता भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. ‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!’ असे म्हणत त्यांनी युवासेनेला डिवचले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात. सिर्फ नाम हि काफी है!’ असे म्हणत त्यांनी दोन फोटो पोस्ट केलेत. यात मोहसीन हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत. तर दुसऱ्या फोटोत राणेंच्या बंगल्यासमोर राडा घातल्याने पोलिसांनी मारहाण केलेल्याचा आहे. दरम्यान, मोहसीन यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वुरुपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!