मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक पार पडली. ओबीसी आरक्षणाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सह्याद्री गेस्ट हाउसवर झालेल्या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार झाले होते. यावेळी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आलं.
ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झाले आहे. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे.
‘ओबीसी आरक्षण कायम ठेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी एकमत होऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल त्यावर चर्चा झाली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण नाही तिथे ते कसे लागू करता येईल यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यांमध्ये आरक्षण कायम राहणार असून १६ जिल्ह्यांमध्ये कमी जास्तपणा होणार आहे’ असे नाना पटोलेंनी बैठकीनंतर सांगितले.
बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. कपिल सिब्बल हे राज्य सरकारचे सरकारी वकील आहेत. ते ही बाजू मांडतील. डेटा मिळवायला प्रयत्न सुरू आहेत. काल कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झाली. ही परिस्थिती सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कानावर टाकलं पाहिजे म्हणून आजची बैठक झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. ओबीसी आरक्षणावरील या महत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे मात्र अनुपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राज्यपाल भवन भाजपा कार्यालय झालं आहे’, कॉंग्रेसचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
