रत्नागिरी : अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत बोलताना त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असे सूचक वक्तव्य करत राणेंनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
राणे म्हणाले, त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना..जसे एका दरोडेखोराला अटक करतात, तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही.
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे? आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार’ असा दमही राणे यांनी कुणाचेही नाव न घेता दिला.
दरम्यान, शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत असा दावा करून राणे यांनी काही जुन्या प्रकरणाला उजाळा दिला आहे. ते प्रकरण कोणते आणि त्याचे पुढे काय झाले याबाबत आता विविध चर्चांना उधान आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राज्यपाल भवन भाजपा कार्यालय झालं आहे’, कॉंग्रेसचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
