🕒 1 min read
पुणे : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे सद्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केल्यापासून ते पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनपर्यंत गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे टार्गेट देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी हृदयसम्राट असा उल्लेख केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांना नेटकऱ्यांनी चांगलच सुनावलं आहे. झालं असं की, काल फडणवीस पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचं पुणे विमानतळावर स्वागत करण्यासाठी पडळकर देखील हजर झाले होते. त्यांचं स्वागत केल्याचं ट्विट पडळकरांच्या ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलं होतं.
टेक्स्ट लिमिटला जागा शिल्लक होती राव " तरूणाईच्या गळ्यातील ताईत, सर्वसमावेशक, भाजपचा बुलंद आवाज " हे पण मावलं असतं !
— Faijal Khan (@faijalkhantroll) March 14, 2021
‘पुणे विमानतळ येथे आज गोरगरीब, उपेक्षित, वंचित, युवक, कष्टकरी ,शेतकऱ्यांचे हृदयसम्राट मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोबत सांगली जि.प.उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे,सचिन देसाई उपस्थित होते.’ असं हे ट्विट आहे. मात्र, शेतकऱ्यांचे हृदयसम्राट असा उल्लेख केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलचं ट्रोल केलं आहे.
बिरोबाची शपथ घेऊन सांगा कुठल्या angle ने फडणवीस जी शेतकरी वाटतात. काय राव तुम्ही पण.
— PravinWagh (@PravinW01599727) March 15, 2021
शेतकऱ्यांचे ह्रदयसम्राट ????????????????????????????????.
मस्त जोक था आहे भेज…— आशीष माळी (@Garjana206) March 14, 2021
तो फाटलेला पांढरा शर्ट अजून शिवुन मिळाला नाही का
— Dnyandev Vagavekar (@dnyandev15070) March 15, 2021
गोरगरिबांचे हृदयसाम्राट????????????…
अरे गुजरातचे रंगाबिल्ला सम्राट आहे त्याचे. pic.twitter.com/em7a1Tu6YQ— Y????️G€SH (@iYogesh_D) March 14, 2021
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
