लखनऊ : आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती न करण्याच निर्णय बसप अध्यक्षा मायावती यांनी जाहीर केला आहे. युती केल्यामुळे फक्त मित्र पक्षांनाच फायदा होतो असे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बसपचे संस्थापाक कांशीराम यांच्या जंयतीनिमित्त मायावती यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मायावती म्हणाल्या की, ‘उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणूका बसप स्वबळावर लढेल. युती केल्यामुळे फक्त मित्रपक्षांनाच फायदा होतो. देशात अनेक राज्यात निवडणूक होऊ घातल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू राज्यात बसप स्वबळावर निवडणूक लढेल’ असे मायावती यांनी जाहीर केले आहे. तसेच या राज्यात बसप कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मायावती म्हणाल्या की देशातील शेतकर्यांना हा कायदा मान्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत. या आंदोलनात ज्या शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी मायावतींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- नोटा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस
- सचिन वाझे ज्या प्रकरणात पहिल्यांदा निलंबित झाले होते ते प्रकरण नेमके आहे तरी काय ?
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

