नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गेल्या महिन्यात ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीचं वेळापत्रकच दिलं होतं. त्यानुसार ८, ९ आणि १० मार्च हे तीन दिवस जयश्री पाटील (सदावर्ते) यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं, तर १२,१५,१६ आणि १७ हे चार दिवस मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांना बाजू मांडण्यासाठी सांगितलं जाणार होतं.मात्र, हे वेळापत्रक सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आणि पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल, असं सांगितलं होतं.
मागच्या सुनावणीत या प्रकरणी सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या आहेत. मराठा आरक्षण खटल्यावर सुनावणीदरम्यन ८ मार्च रोजी सुप्रीम कोर्टानं देशात आरक्षणावर ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्दयासंदर्भात सर्व राज्यांना नोटीस जारी केली आहे. तसंच १०२व्या घटनादुरुस्तीसंदर्भात राज्यसरकारांचं म्हणणं काय आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला जाणून घ्यायचं आहे.सुप्रीम कोर्टाच्या या नोटिशीमुळे मराठा आरक्षणाचा खटला महत्त्वाच्या वळणावर आल्याचं मानलं जातंय.
सुनावणीआधी चार राज्यांनी उत्तरासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीवर अर्थात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत राज्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नोटिसा दिल्या गेल्या आहेत. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ ते १७ मार्च दरम्यान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेस्ट इंडिजच्या महान बॅट्समन व्हिव रिचर्ड्स यांनी मोदींचे आभार; सत्य काय जाणुन घ्या
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- ऑनलाईन खरेदी च्या काळात ग्राहकांच्या हक्कांच संरक्षण महत्त्वाचं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

