मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.राज्यातील कोविड 19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यामुळे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच टोले लगावलेत.
फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येत नाही, चाचण्यांमध्ये तडजोड करत कोरोना संसर्गाचा दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळं कोरोनाविरोधी लढ्यात अडथळे येत आहेत. बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करणं बंद करा, असं फडणवीसांनी पत्रातून म्हटलं आहे.
@Dev_Fadnavis जी, आजच मा. @PMOindia यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल.
आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? https://t.co/kpIk2341Tf— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 8, 2021
यारून जयंत पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी नुकतंच कौतुक केलंय. याची आपल्याला जाणीव असेल अशी आशा आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण? माननीय पंतप्रधान की तुम्ही?,’ असा खोचक सवाल पाटील यांनी फडणवीसांना केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांचा काय प्रतिक्रिया असेल याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना फोन करून कौतूक केल्याबद्दल राज्यातील भाजप नेत्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे हे मात्र खरे.
महत्त्वाच्या बातम्या
- मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम! कोरोना पसरवणाऱ्या चीनच्या लसीला ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी
- आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय! रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही


