Share

आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. कधी एकमेकांच्या पक्षश्रेष्ठींवर टीका तर कधी कोरोना परिस्थितीवरून राजकारण. त्यातच कामाच्या श्रेयवादाचा मुद्दा आणि निर्णय क्षमता यावरून तर काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेवर नाराज आहेत. पण पूर्वीपासूनचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीमुळे तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे हे वादळ पेल्यातच शमते. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक धक्कादायक विधान करून राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची झूम बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची शक्तिस्थळे मजबूत करण्यासाठी इंटकला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पटोले म्हणाले. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले आहे.

पटोले म्हणाले, कामगार कायदे मोडीत काढीत मालकधार्जिणे कायदे बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करत असून केंद्राचे कामगारविरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही. तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून इंटकच्या सूचनेवरून अनेक कामगार हिताचे कायदे बनवले आहेत. सध्या केंद्र सरकार मात्र शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे करत आहे. याविरोधात काँग्रेस लढा देण्याचे काम करत असून काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याचे पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!