Share

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी

Published On: 

मुंबई : कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोहोचवणे अशा अनेक कामांमध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. ३१ डिसेंबर २०२० अखेर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून केली आहे. आता इतर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशीच मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे केले आहे.

लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनादेखील कोविड योद्धे समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे आवश्यक केले आहे. या सगळ्याचा विचार करता, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!