Share

परिवहन मंत्र्याच्या औरंगाबाद दौऱ्यात गर्दीचा पूर, कोरोनाची तिसरी लाट आल्यास जबाबदार कोण?

Published On: 

औरंगाबाद : लॉकडाऊन, कडक निर्बंध यांचा एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झालेला आहे. एसटीला झालेला हजारो कोटींचा भुर्दंड भरुन काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी (दि.१६) सांगितले. शहरातील महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी परब शहरात आले होते. चिकलठाणा येथील कार्यशाळेला सर्वप्रथम भेट दिल्यानंतर परब सिडको येथील बसस्थानकाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र गाडीतून पाच मिनिटे उतरत अवघ्या दहा मिनिटांमध्येच आपली पाहणी आटोपली. याठिकाणी कार्यकर्ते, एसटी कर्मचारी यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीला कोरोना नियमांचा पूर्णत: विसर पडल्याचे चित्र होते.

विविध विकासकामांच्या पाहणीसाठी परिवहन मंत्री अनिल परब शुक्रवारी (दि.१६) औरंगाबादेत आले होते. चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली. यामध्ये अजून काही सुधारणा करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या साठा बांधणी, इंजिन आदी विभागांना मंत्री परब यांनी भेट दिली. यावेळी कार्यशाळेचे व्यवस्थापक किशोर सोमवंशी यांनी सुरू असलेल्या कामांबाबत मंत्री परब यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सिडको बसस्थानक याठिकाणी ते पाहणीसाठी आले.

परिवहन मंत्री पाहणीसाठी येणार म्हटल्यावर नेहमीच कचऱ्याने भरलेले सिडको बसस्थानक चकाचक करण्यात आले होते. रांगोळ्या, पुष्पगुच्छ, हार घेऊन कर्मचारी तयार होते. मात्र परब यांनी अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्येच आपला पाहणी कार्यक्रम आटोपला. त्यामुळे अनेकांना हारतुरे देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली नाही. तसेच याठिकाणी कार्यकर्ते आणि कर्मचारी यांची एकच गर्दी झाली होती. या गर्दीला कोरोनाचाही विसर पडल्याचे पाहायला मिळाले. यातून कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. मात्र राजकीय नेत्यांना याचे कुठलेही सोयरसुतक नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आल्यास याला राजकीय नेत्यांचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!